Sunday, April 19, 2026
Sunday, April 19, 2026
Home आरोग्य सेवाउपयुक्त प्रपत्र साथरोग उदभाविल्यास करावयाच्या उपाययोजना

साथरोग उदभाविल्यास करावयाच्या उपाययोजना

0 comment

साथरोग उदभाविल्यास करावयाच्या उपाययोजना येथे click करून pdf download करून घ्यावी

साथरोग उदभाविल्यास करावयाच्या उपाययोजना

साथ संशोधन:

एखाद्या गावात किंवा ठराविक भागात, ठराविक कालावधीत सारख्याच लक्षणाचे रुग्ण निश्चित अपेक्षेपेक्षा जास्त आढळल्यास त्यास साथ म्हणतात, साथीच्या रोगाचा उद्रेक होतो तेव्हा ती साथ कोणत्या रोगाची आहे, व त्या साथ उदभण्याची कारणे काय आहेत याची शहानिशा त्वरित केली तर असलेली साथ नियत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करता येणे शक्य होते 

साथीची शहानिशा :

जेव्हा एखाद्या रोगाची/आजाराची लागण एखाद्या गावात,भागात, ठराविक कालावधीत नेहमी पेक्षा जास्त आढळून येते. तेव्हा त्यास साथ समजावे, 

रूग्णाची माहिती: वैद्यकीय पथके तयार करून साथग्रस्त गावातील घरांना भेटी देवून नवीन रुग्णाची नोंद करावी. रुग्णाची सविस्तर माहिती घेणे. उदा नाव, वय,लिंग, पूर्ण पत्ता, लक्षण सुरु झाल्याची दिनाक, मृत्यु  झाला असल्यास मृत्यूची तारीख, केलेले औषधोपचार इ बाबीची नोंद करावी.

जलजन्य साथरोग संशोधन करण्यापूर्वी साथ संशोधन शास्त्र जाणून घेणे आवश्यक आहे

  • रोग/आजार केव्हा झाला

रुग्ण कोणत्या क्षणी, कोणत्या दिवशी, कोणत्या महिन्यात व कोणत्या वर्षी दिसून आले, विशिष्ठ ऋतूशी साथीचा संबध आहे काय?

2) रोग/आजार कोठे झाला

ठिकाण: रोगाचा/आजाराचा प्रादुर्भाव नेमका कोठे झाला याची माहिती घेणे आवशक आहे, यासाठी बिंदू नकाशा (स्पॉट मॅप) बिंदू नकाशा काढल्यास याची माहिती मिळेल, बिंदू नकाशावरून साथीच्या रोगाचा/आजाराचा प्रादुर्भाव कोठे जास्त, कोठे कमी किंवा मुळीच नाही याची माहिती एकाच दृष्टीक्षेपात मिळते.

बिंदू नकाशा कसा काढावा:

बिंदू नकाशात गावाच्या सीमा रेषा, त्यातील रस्ते, गल्ल्या किंवा वॉर्ड,गावातील ठळक ठिकाणे, पाणी पूरवठ्याची साधने, गटार, इ सह काढावा. लागण रुग्ण भाग,घरे, नकाशात दर्शवणे, तसेच लागण रुग्ण हि या आजाराने/ रोगाने लागण: प्रत्येक रुग्णाचे वय, लिंग,लक्षणे इ बाबीची माहिती घ्यावी. रुग्णाचा मागील १० दिवसापूर्वीचा पूर्व इतिहास घेणे,(प्रवास,अन्न सेवन,कार्यक्रमात सहभाग इ)

हा रोग/आजार कसा झाला%

     रोग केंव्हा झाला,कोठे झाला व रोगग्रस्त व्यक्तीची संख्या या माहितीच्या आधारे रोगाचे उगमस्थान शोधून काढता येते.

उपाययोजनां:

गावातील पिण्याच्या पाण्याच्या उदभवाचा परिसर, पाणी पुरवठा योजनेची पाहणी करावी त्यात व्हॉल्व गळती, पाईप गळती, खाजगी गळती बाबत ची पाहणी करावी.

लागणग्रस्त भागातील वरील सार्व मुद्याची माहिती व्यास्थित घेतल्यामुळे रोगाचे उगमस्थान निच्चीत करता येते. उदा दुषित सार्वजनिक विहीर, कुपनलिका,सदोष जलवाहिनी इ, त्यानुसार वेळीस व परिणामकारक प्रतिबंधक उपाययोजना आखता येते, रोगाच्या उगमस्थानाबाबत अपूर्ण माहिती घेतल्यास उपाययोजना सदोष होईल, परिणामी रोगप्रसार त्वरित आटोक्यात आणता येणार नाही.

साथरोग निदान निश्चिती :

साथीचा अहवाल मिळताच वैद्यकीय अधिकारी यांनी त्वरित संबाधित भागात भेट देवून रुग्णाची तपासणी करून साथरोगाचे निदान करता येत नसेल, त्यावेळी प्रयोगशाळेची मदत घेण्यात यावी. आवश्यकतेनुसार विषाणुची तपासणीसाठी रक्त,  शौच इ नमुने तपासणी पाठविण्यात यावे.

पाणी नमुने तपासणी साठी घेणे आवश्यक आहे, साथग्रस्थ गावातील पाणी नमुने घेताना लागण असलेल्या घरातील, पाणी पुरवठा योजनेतील पहिले, मधले व शेवटच्या टोकाजवळील घरातील पाणी उदभवाचा पाणी नमुना तपासणी साठी घेण्यात यावा. तसेच टी सी एल नमुना क्लोरीनचे प्रमाण तपासणी साठी घेण्यात यावेत.

प्रतिबंधात्मक उपाययोजना:

वरील सर्व मुद्याचा अभ्यास केल्यावर कोणती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी हे ठरवून त्यानुसार अगोदर सुरु करण्यात आलेल्या कार्यवाहीत काही फरक करणे आवश्यक असल्यास त्याप्रमणे बदल करावा.

रोगाचा लवकरात लवकर निदान:

साथीच्या रोगांचे अचूक निदान लवकरात लवकर होणे, हे रोगाच्या पुढील प्रसारास आळा घालण्याच्या दृष्टीने अत्यत महत्वाचे आहे.

     लवकरात लवकर निदान होण्यासाठी रक्त, शौच, पाणी,अन्न उलटी, लघवी, तपासण्याची आवश्यकता असतो. ज्या वेळी जुलाबाची साथ सुरु होते, त्यावेळी ती कॉलरा, गस्ट्रो, अतिसार यापैकी कोणत्या आजाराची साथ आहे हे फक्त शौच नमुना तपसणी नतरच ठरविता येते.

विलगीकरण:

साथीच्या  रोगाचा प्रसार हा एकापासून दुसऱ्या ठराविक माध्यमाद्वारे ओत असतो. म्हणून अशा रुग्णांना निरोगी लोकांपासून विलग केल्यास इतरांना त्याच्या पासून संसर्ग होणार नाही. व साथ लवकरात लवकर आटोक्यात येईल.

     विलगीकरण कक्षात भरती केलेल्या तसेच बाह्य रुग्ण म्हणून उपचार केलेल्या अशा सर्व रुग्णाची माहिती ठेवावी, एकूण किती व्यक्तीना रोगाची लागण झाली या बाबतची आकडेवारी सहज उपलब्ध होईल.

     रुग्णाचे सहवासीताची माहिती घेवून आवश्यकता असल्यास औषधोपचार करावा.

सानियत्रण (सर्वेलन्स ):

 एखाद्या आजाराची साथ सुरु झाल्याचे समजताच आजारची व्याप्ती कळण्यासाठी घरोघर भेटी देवून रुग्णाचे सनिरीक्षण करावे, या बरोबर साथग्रस्त गावालगतच्या  परिसरात सर्व गावामध्ये संनिरीक्षण करावे. साथरोग सर्वेक्षण कामासाठी आरोग्य कर्मचारी/ वैद्यकीय अधिकारी याचे डयुटी चार्ट दिनाक निहाय तयार करावे. तसेच सर्वेक्षणासाठी भाग वाटप करण्यात यावे. गरज असल्यास प्रा आ केंद्रातील इतर उपकेंद्रातील आरोग्य कर्मचारी यांची डयुटी लावण्यात यावी.

पाण्याचे शुद्धीकरण:

     शुद्ध पाणी पुरवठा करण्याची जबाबदरी ग्रामपंचायतीची आहे, विहीरीच्या पाण्याचे शुद्धीकरण व नळ पाणी पुरवठा योजना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी संबधित ग्रामपंचायतीची आहे, याबाबत जरूर तेथे आरोग्य कर्मचारी यांनी तांत्रिक मार्गदर्शन करावे/

अहवाल सादरीकरण :

साथरोगाचे अहवाल नियमित पाठविल्यामुळे साथीची व्याप्ती, प्रगती व केलेल्या उपाययोजनेची परिणामकारकता याबाबत अद्यावत माहिती मिळेल.

प्राथमिक अहवाल: प्रथम भेटीनंतर त्वरित उद्रेक चालू असताना दूरध्वनी द्वारे अथवा इमेल द्वारे सादर करावा.

दैनदिन अहवाल: हा अहवाल साठीचा उद्रेक चालू असताना दूरध्वनी द्वारे अथवा इमेल द्वारे सादर करावा.

साथरोग संशोधन अहवाल (साथीचा अंतिम अहवाल)

हा अहवाल साथ आटोक्यात आल्यानंतर सात दिवसाच्या आत पाठवावा

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

महत्वाचे शासननिर्णय उपलब्ध संकलन- ई, हे संकेतस्थळ दिनांक १६/०८/२०१८ पासून सर्व कर्मचारी अधिकारी यांचे साठी निर्मित करण्यात अलालेले आहे. या संकेस्थळावर सुरुवाती पासून ते आजपावेतोचे अद्यावत महत्वाचे शासन निर्णय, परिपत्रके आणि अधिसूचना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

माहितीस्थळ भेटीबाबत

27345

© 2024 All Rights Reserved by MAHAZPAROGYAKUNION | Developed by Mr. Amol Gopal Zambare.