आरोग्य सेवा
सेवाविषयक
लेखाविषयक
कायदे व नियम
ग्रामविकास सेवा
महसूल सेवा
नमुने
शासकीय योजना
ह्या संकेस्थळच्या देखभालीसाठी अमूल्य योगदान व सहकार्य करणारे मान्यवरांचे आभार, आभार, आभार…
महत्वाचे शासननिर्णय उपलब्ध संकलन- ई, हे संकेतस्थळ दिनांक १६/०८/२०१८ पासून सर्व कर्मचारी अधिकारी यांचे साठी निर्मित करण्यात अलालेले आहे. या संकेस्थळावर सुरुवाती पासून ते आजपावेतोचे अद्यावत महत्वाचे शासन निर्णय, परिपत्रके आणि अधिसूचना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
या संकेतस्थळावर वर्षनिहाय विषयनिहाय माहिती उपलब्ध झाल्याने आवश्यकतेनुसार कुठला शासननिर्णय शोधण्यास अगदी सोयीस्कर व्हावी यासाठी https://mahazparogyakunion.in वेबसाईट तयार केली आहे. या मध्ये सेवाविषयक, लेखाविषयक, ग्रामविकास, उपयुक्त कायदे नियम, आरोग्य शासननिर्णय , आरोग्य संख्याशास्त्र EXCEL नमुने, उपयुक्त नमुने ई अनेक महत्वपूर्ण बाबी या वर उपलब्ध आहेत.
अधिकारी व कर्मचार्यांना अद्यावत माहितीचा कार्यालयीन कार्यलयीन कामकाजामध्ये सुलभता यावी हा संकेतस्थळाचा मुख्य उद्देश होय.
आपल्याला सहज शासननिर्णय उपलब्ध व्हावे व त्याचा उपयोग करून दैनदिन कामकाज मध्ये येणाऱ्या अडचणी सहज सोडविण्यासाठी एक सक्षम प्रयत्न करत आहे त्याचा फायदा नक्की आपल्याला होईलच.
आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल, माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
वरील माहिती बाबत काही सूचना असल्यास अभिप्राय FORM, Contact form हा फोर्म द्वारे नोंदवू शकतात, तसेच आपले बहुमुल्य अभिप्राय नोंदवावे हि आपणास विनंती, आपल्या अभिप्रायामुळे संकेतस्थळ अद्यावत करण्यास प्रेरणा मिळेल.
अभिप्राय
माझ्या कुटुंबाला हे माहित आहे काय?

आपली प्रथम सुरक्षित जागा म्हणजे कुटुंब, तुम्हाला गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब होय, म्हणून आपल्याकडे जे काही आहे ते आपण संरक्षित केलेच पाहिजे.
आपण कामगार, कर्मचारी व अधिकारी म्हणून सेवेत कार्यरत असतांना सध्याच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या युगात अनेक आकस्मिक समस्या येत असतात तसेच आपणांस दैनंदिन कामकाजात येणारे ताण-तणाव, मुलांचे शिक्षण, उच्च शिक्षण, कौटुंबिक जबाबदाऱ्या, मुला/ मुलींचे विवाह, कुटुंबियांसाठी निवासाची सोय, आजारपण, इत्यादी बाबींमुळे आयुष्यात बऱ्याच समस्या, उतार-चढाव आपण अनुभवत असतो.
सर्वसाधारणपणे दैनंदिन कामात आपण नोकरीमध्ये खूप व्यस्त असतो. कामकाजा संदर्भात आवश्यक त्या अभिलेखांचे (Record keeping) आपण जतन करीत असतोच. मात्र बऱ्याच अंशी अभिलेख नोंदीचे काम हे कार्यालयीन कामकाजाचे अंगभूत असल्याने ते काम करणे अभिप्रेत आहेच, किंबहुना हे Record keeping चे (सहागठा पद्धतीने) काम हे विविध स्तरावरुन पर्यवेक्षण पर्यवेक्षीय अधिकारी यांचेमार्फत होतच असते, त्यासाठी आपण कर्तव्य म्हणून आपला वेळही देतो.
मात्र आपली वैयक्तिक महत्वाची दस्ताएवज उदा. मालमत्ता विषयक, सेवाविषयक, आर्थिक विषयक व्यवस्थित जतन वा अद्यावत करण्यास, वर्गवारी करुन विषयनिहाय जतन करण्यास आपण वेळ काढत नाही वा दैनंदिन कामकाजातून आपल्याला वेळही मिळत नसतो वा दुर्लक्ष तरी होत असते, तथा आपल्या सेवाविषयक,आर्थिक बाबी सहज सोप्या पद्धतीने नोंदवून ठेवाव्यात असा कधी प्रयत्न ही करीत नाही असे बऱ्याच घटनावरुन निदर्शनास येते. परिणामत: त्यामुळे नित्य उपयुक्त कागदपत्रे कुठे तरी ठेवले जातात, गहाळ होतात किंवा ती वेळेवर उपलब्ध होऊ शकत नाहीत.
वेळोवेळी सेवेत असतांनाही अशा कागदपत्राची आवश्यकता भासतेच, शिवाय दुर्दैवाने आयुष्यात अचानकपणे काही आकस्मिक घटना घडल्यास अधिकारी, कर्मचा-यांच्या कुटुंबियांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते असा ही अनुभव प्रत्येकास काही घटनांमधून अनुभवास आलेले असतीलच. अधिकारी, कर्मचारी हे सामाजिक बांधिलकी जोपासुन सोबतच लोकसेवक म्हणून नेमुन दिलेल्या जबाबदा-या कर्तव्य पूर्ण करतातच, सोबत आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी व आपल्या कुटुंबियांची जबाबदारी व उदरनिर्वाहसाठी काम करतात.
मात्र ब-याच वेळा कुटुंबियांना आपले सेवाविषयक बाबी, उत्पन्न व त्यानुसार आर्थिक नियोजन, गुंतवणुकीबाबत अनभिन्नता दिसून येते.
परिणामी आयुष्यात आकस्मिक दुर्दैवी घटना (आकस्मिक गंभीर आजार, अपघात, मृत्यु ई) घडल्यावर आपले कुटुंबीयाना अत्यंत अड़चणीना सामोरे जावे लागते. दुर्दैवी घटना घडल्याने आधीच नाजुक परीस्थितीत असलेले कुटुंबियास काय करावे, कोणकोणते सेवाविषयक, आर्थिक लाभ मिळतील, त्यासाठी आवश्यक दस्ताएवज कोणते वा कसे उपलब्ध होतील, यासाठी कुणाशी संपर्क करावे अशी केविलवाणी परीस्थिती होते, अश्या अनेक घटना सातत्याने समोर येत असल्याचे अनुभवयास येतात व हे अनुभव नेहमीच, सातत्याने समोर आल्याने बऱ्याचदा मनात विचार येतो ‘’मी नसताना ?……………….’’
पान क्र १
अधिकारी, कर्मचा-याच्या जीवनात अचानकपणे दुर्दैवाने होणा-या आकस्मिक घटनामुळे त्यांच्या अनुपस्थितीत वा दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबियांना अनेक समस्यांचा सामना करावा लागु नये म्हणून ही वस्तुस्थिति, पार्श्वभूमी, घटनाची वारंवारिता पहाता एक संकल्पना समोर आली.
आपल्यासह आपल्या कुटुंबियासाठी वैयक्तिक स्वरुपाची सर्वसमावेशक माहिती असलेली कुटुंबपुस्तिका, नोंदवही, हस्तपुस्तिका असावी, त्यात आपली सेवाविषयक, मालमत्ता,आर्थिक माहितीचा समावेश असेल व अश्या संकलित माहितीचा आपल्या कुटुंबाला आपल्या गैरह्जेरीत वा दुर्दैवी घटना घडल्यावर उपयोगी पडू शकते असा विचार आला आणि तो विचार सोबत काम करणारे सहकारी यांचेसमोर मांडला आणि त्यावर चर्चा केली, आणि ज्याने त्याने आपआपल्या परिवाराला आपल्या मालमत्ता, कर्ज, उत्पन्नानुसार गुंतवणुक,सेवाविषयक,आर्थिक बाबी ई बाबत किमान माहिती आहे काय? याबाबत विचारणा करावी व याचे उत्तर ही नकारात्मक स्वरुपाचे आले आणि तेव्हा सर्व मिळून ठरविले की खरच अशी सर्वसमावेशक माहितीपुस्तिका, कुटुंबपुस्तिका असावी अथवा किमान संकलन आपल्या कुटुंबियासाठी असावे.
तदनंतर अश्या सर्वसमावेशक कुटुंबपुस्तिका तयार करण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे, वा या हस्तपुस्तिकेला सेवापुस्तिके समान कुटुंबपुस्तिका म्हणु शकतो. ह्या कुटुंबपुस्तिकेत विविध प्रपत्रांचा (मालमत्ता, कर्ज, उत्पन्नानुसार गुंतवणुक,सेवाविषयक,आर्थिकबाबी) समावेश करण्यात आलेला आहे. ह्या कुटुंबपुस्तीकेतील प्रपत्रात आवश्यक अशी माहिती भरल्यास व वेळोवेळी अद्यावत केल्यावर ह्या माहितीचा गरजेनुसार योग्य वेळवर आपल्या कुटुंबातील व्यक्तींना सहज उपलब्ध होऊ शकेल व निच्चीत उपयोग होइल अशी शास्वती, खात्री आहे.

हे पुस्तक आपणास हवे असल्यास खालील फॉर्म मध्ये आवश्यक ती माहिती( पत्ता व मोबाईल क्रमांक) व पुस्तकाचे मूल्य 261(पोस्तेज खर्चासह)
(*Rs. 261 /- only including shipping charges) सोबतच्या स्कनेर च्या सहाय्याने भरून प्राप्त करून घेवू शकता,