Saturday, March 7, 2026
Saturday, March 7, 2026
Home आरोग्य सेवाउपयुक्त प्रपत्र साथरोग संनियंत्रण

साथरोग संनियंत्रण

0 comment

साथरोग

   जलजन्‍य आजारांचे दैनंदिन स्‍वरुपातील संनियंत्रणाचे महत्‍वपूर्ण कार्य साथरोग नियंत्रण कार्यक्रमामार्फत केले जाते. रुग्‍णसंख्‍येत एखादया ठिकाणी ठराविक वेळेत अचानक वाढ झाल्यास त्‍याला साथरोग उद्रेक म्‍हणतात. 

आपल्‍याला आढळणा-या दैनंदिन रुग्‍णांमध्‍ये प्रामुख्‍याने ताप, अतिसार, खोकला इत्‍यादि लक्षणांचे रुग्‍ण जास्‍त प्रमाणात असतात. ही लक्षणे असणारे बरेचसे रोग संसंर्गजन्‍य असतात. साथरोग आजाराबाबत रुग्‍ण संख्‍या मर्यादित राहील व पर्यायाने मृत्‍यू टाळता येईल.

यादृष्‍टीने विशेष प्रयत्‍न केले जातात. यासाठी गावभेटी मध्‍ये आरोग्‍य कर्मचा-यामार्फत घरोघर सर्वेक्षण केले जाते. आजारी व्‍यक्‍ती ओळखून त्‍वरित औषध उपचार केला जातो. साथरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गॅस्‍ट्रो, कॉलरा,  अतिसार, काविळ,  विषमज्‍वर या आजारांचे संनियंत्रण केले जाते. साथ उदभवण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या विविध घटकांची आकडेवारी गोळा करून त्यानुसार करावयाची कार्यवाही  म्हणजे आरोग्य साथरोग सर्वक्षण. 

संसर्गजन्य रोग

पाण्याद्वारे पसरणारे रोग  :     तीव्र अतिसार,कॉलरा, काविळ A आणि E,पोलिओ लेप्टोस्पायरोसीस

हवेद्वारे पसरणारे रोग: कांजण्या,  सार्स, इन्फल्युएंझा ए.एच. १ एन १   क्षयरोग  घटसर्प  डांग्या खोकला 

किटकजन्य आजार

प्‍लेग,तीव्र मेंदूज्‍वर,  चंडीपुरा मेंदूज्‍वर,  हत्तीरोग, जपानी मेंदूज्वर,  हिवताप, चिकुनगुन्‍या,डेंग्‍यू              काँगो हिमोरेजीक फिवर

सर्वेक्षण कशासाठी

     सार्वजनिक आरोग्याच्या उपाययोजना मध्ये सर्वेक्षण हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. विविध आरोग्य घटनांवर, रोग उद्रेकावर सातत्याने नजर ठेवणे व वेळीच कृती करणे हे सर्वेक्षणामुळे साध्य होते. 

अ) रोगजंतूवर नियंत्रण कार्यवाही 
         १) लवकरात लवकर निदान
         २) वर्दी (Notification )
         ३) रुग्णाचे विलगीकरण (Isolation)
         ४) त्वरित व योग्य उपचार
         ५) रुग्णाचे सहवासितांवर प्रतिबंधात्मक औषोधोपचार
         ६) सहनिरिक्षण (Survelance)
         ७) बिंदूं नकाशा (Spot Map)
         ८) नमुने तपासणी ( पाणी नमुना,टीसीएल नमुना, शौच नमुना,  अन्न तपासणी ई

ब) दूषित माध्यमावर नियंत्रण 
       १) रुग्णाच्या वस्तूचे व मलमूत्राचे निर्जंतुकिकरण
       २) पाण्याचे शुद्धीकरण
       ३) सुरक्षित अन्न /अन्न पदार्थाची स्वछता

 क) रोगक्षम व्यक्तींना संरक्षण
      १) लसीकरण
      २) परिसर स्वछता व वैयक्तिक स्वछता
      ३) आरोग्य शिक्षण

 ड) अहवाल :साथरोग नियंत्रणासंबधी अहवाल 

 इ) कृतीयोजना : साथरोग नियंत्रणासंबधी कृती  योजना

  • Epidemic_Act_1897
  • साथरोग विषयक काही सज्ञाचे सोपे अर्थ  
  • विविध नमुने घेण्याच्या पद्धत
  • साथरोग नियंत्रण,(साथरोग उदभल्यास करावयाच्या उपाययोजना )
  • पाणी शुद्धीकरणा विषयी माहिती

पाणी गुणवत्तचे मापदंड,निकष (जैवीक,  रासायनिक )  

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

महत्वाचे शासननिर्णय उपलब्ध संकलन- ई, हे संकेतस्थळ दिनांक १६/०८/२०१८ पासून सर्व कर्मचारी अधिकारी यांचे साठी निर्मित करण्यात अलालेले आहे. या संकेस्थळावर सुरुवाती पासून ते आजपावेतोचे अद्यावत महत्वाचे शासन निर्णय, परिपत्रके आणि अधिसूचना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

माहितीस्थळ भेटीबाबत

20052

© 2024 All Rights Reserved by MAHAZPAROGYAKUNION | Developed by Mr. Amol Gopal Zambare.